...यांची महाराष्ट्राला गरज
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी सोशल मीडियावरून थेट संवाद साधला. यामध्ये त्यांनी कोरोना विरोधात लढणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेला धन्यवाद म्हटले. त्यांनी कोरोना विरोधी व्यूहरचना आखताना रुग्णालयांची तीन भागात विभागणी केली जाणार असल्याचे घोषित केले. सोबतच, मेडिकल कोअरमध्ये काम केलेल्या निवृत्त सैनिक आणि प्रशिक्षित तसेच काम करण्यास इच्छुक नर्स, वॉर्ड बॉय यांना पुढे येउन या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. इच्छुकांसाठी त्यांनी एक ईमेल आयडी सुद्धा जारी केला आहे.
प्रशिक्षित नर्स, वॉर्ड बॉय सैनिकांसाठी विशेष ईमेल आयडी
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्यात गुणाकार सुरू झालेला आहे. त्यामुळे, या युद्धात आपल्याला आता जास्तीत-जास्त योद्धांची गरज आहे. यामध्ये लष्करातील निवृत्त सैनिक आणि अधिकारी ज्यांना मेडिकल कोअरचा अनुभव आहे. निवृत्त नर्स किंवा वॉर्ड बॉय आणि असे वैद्यकीय प्रशिक्षण मिळवलेले नर्स आणि ब्रदर ज्यांना रुग्णालयात जागा नसल्याने काम मिळाले नाही. यापैकी ज्यांची कोरोनाविरुद्ध युद्धात सहभागी होण्याची इच्छा आहे. त्यांनी covidyoddha@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधा. परंतु, कृपा करून कुणीही गरज नसताना यावर मेल पाठवू नका. विनाकारण ई-मेल पाठवून ही ई-मेल आयडी ब्लॉक करू नका असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केले.
Post a Comment