पंचांचा गाेलंदाजाची कॅप, चष्मा सांभाळण्यास नकार; ईसीबीची मान्यता, काेराेनाच्या भीतीमुळे नवा निर्णय
माय अहमदनगर वेब टीम
लंडन - सामन्यादरम्यान गाेलंदाजी करताना बाॅलर हे मैदानावर उपस्थित पंचांकडे आपली कॅप आणि चष्मा साेपवतात. मात्र, अनेक वर्षांपासूनच्या या अलिखित परंपरेला आता ब्रेक लागणार आहे. कारण काेराेनाच्या भीतीमुळे आता सामनाधिकाऱ्यांनीच याबाबत सावध पवित्रा घेणारी मागणी केली. याला इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळानेही (ईसीबी) मान्यता दर्शवली. त्यामुळेच आता गाेलंदाज हे मैदानावर पंचांकडे आपल्या कॅप आणि चष्म्यासारख्या वस्तू साेपवू शकणार नाहीत. याला पंचांचा नकार असेल. यातूनच आता गाेलंदाजांना आपल्या सर्व काही वस्तू बाउंड्रीवरच ठेवाव्या लागणार आहेत. याशिवाय पंचांना मैदानावर असताना हाताला ग्लोव्हज किंवा मेडिकलसंबंधी काेणतीही वस्तू घालण्याची परवानगी नाही, अशी माहिती ईसीबीच्या वतीने देण्यात आली.
संसर्गाचा माेठा धाेका मैदानावर : काेराेना या महामारीच्या संकटाने सध्या जगभरात आराेग्याविषयीची काळजी घेण्याची माेठी शिकवण दिली. त्यामुळे प्रत्येक जण याचे नियम पाळताे. क्रिकेटच्या मैदानावर खेळताना व्हायरसच्या संसर्गाचा माेठा धाेका असताे. कारण चेंडू सीमारेषेवर गेल्यास बाॅलबाॅय आणि स्टेडियममध्ये गेल्यास चाहत्याच्या हाताचा स्पर्श हाेताे. यातूनही हा धाेका असताे. याशिवाय पंच हे चेंडूंचा आकार पाहतात. यातून पंच आणि गाेलंदाजांमध्ये या चेंडूची देवाणघेवाण हाेतेय.
डीआरएसमधून अंपायर काॅल्स वगळावे : गाउल्ड
डिसिजन िरव्ह्यू सिस्टिममधील (डीआरएस) अंपायर्सच्या काॅलला वगळण्यात यावे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावरील माजी पंच इयान गाउल्ड यांनी केली. २००९ मध्ये पहिल्यांदा या डीआरएसच्या संकल्पनेचा वापर कसाेटी सामन्यात करण्यात आला. हीच प्रणाली आता तिन्ही फाॅरमॅटमध्ये वापरली जात आहे. २५१ आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचगिरी करणाऱ्या गाउल्ड यांनी याबाबतचे आपले मत मांडले. ‘जगात याच्या वापरासाठी सर्वप्रथम पंचांच्या काॅलला वगळावे लागेल. याचा वापर पायचीतच्या निर्णयासाठी हाेताे. या एका निर्णयासाठी तब्बल ३७ कॅमेऱ्यांचा वापर हाेताेय, असेही ते म्हणाले.
Post a Comment