मुख्यमंत्री केजरीवाल यांचा मोठा निर्णय...
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानी दिल्लीत संक्रमितांच्या वाढत्या आकड्यावर चिंता व्यक्त केली आहे. शनिवारी झालेल्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये ते म्हणाले की, इतक्या दिवस रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत होती, आता काही रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीयेत. पण, त्यांच्या चाचणीनंतर कोरोना झाल्याचे समोर येत आहे. हे खूप चिंताजनक आहे. हे लक्षात घेऊन, लॉकडाउनमध्ये कोणत्याच प्रकारची सुट दिली जाणार नाही.
यावेळी बोलताना केजरीवाल पुढे म्हणाले की, 'एका आठवड्यानंतर या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्या वेळेस जी परिस्थिती असेल, त्यावरुन पुढील निर्णय घेतला जाईल. यावरुन घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. आपल्याला कोरोनाशी सोबत मिलून सामना करायचा आहे. शनिवारी दिल्लीमध्ये 736 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या, यापेकी 186 रुग्ण सापडले आहेत. हा आकडा खूप जास्त आहे. यासोबतच दिल्लीतील संक्रमितांचा आकडा 1893 झाला आहे तर 43 जणांचा मृत्यू झाला आहे.' केंद्र सरकारने लॉकडाउन फेज -2 मध्ये 20 एप्रिलपासून अनेक क्षेत्रामध्ये सूट दिली आहे. अनेक राज्य केंद्राच्या गाइडलाइननुसार, लॉकडाउनमध्ये सूट देत आहेत. परंतू, देशाच्या राजधानीमध्ये असे होताना दिसत नाही.
'27 एप्रिलला आढावा घेतला जाईल'
मुख्यमंत्री पुढे म्हाले की, 'दिल्लीमध्ये 77 नियंत्रण झोन आहेत. यात घेतलेल्या सँपलमधून रुग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. ज्या परिसरात नागरिक लॉकडाउनचे पालन करत नाहीयेत, त्या परिसरात संक्रमितांची संख्या वाढत आहे. जगातील विकसित देशात कोरोनामुळे काय परिस्थिती आहे, हे आपण पाहतच आहात. आपल्या देशात लॉकडाउन केले नसते, तर काय परिस्थिती झाली असती, याचा विचार करणे अवघड आहे.'
Post a Comment