आयपीएल सामने तीन स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना खेळवले जावेत : पीटरसन


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -  यंदा छोट्या प्रकारात प्रेक्षकांविना आयपीएल स्पर्धा घेण्यात यावी, असे केविन पीटरसनने सुचवले आहे. त्याने म्हटले की, चाहत्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. ही क्रिकेटच्या सत्राची सुरुवात आहे. मला वाटते, जगातील प्रत्येक खेळाडू आयपीएल खेळू इच्छितात. ही स्पर्धा केवळ खेळाडू व फ्रँचायझी यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असते असे नाही. त्याच्या आयोजनामागे काम करत असलेल्या लोकांचे महत्त्वाचे योगदान असते. त्यावर हजारो लोकांचे घर अवलंबून आहे. पीटरसनने म्हटले, ‘सामने तीन सामन्यांतच खेळवावे. तेथे प्रेक्षक नसावे. खेळाडूंनी तीन-चार आठवड्यांत स्पर्धा खेळावी. ही छोटी स्पर्धा असावी.’ माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकरने देखील पीटरसनचे समर्थन केले. त्याने म्हटले की, सर्व परवानग्या मिळाल्यानंतर स्पर्धेचे आयोजन केले पाहिजे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post