यूपी संचारबंदी / पोलिसांवर कुऱ्हाड आणि फावड्याने हल्ला
माय अहमदनगर वेब टीम
कन्नौज - उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये लॉकडाउनदरम्यान शुक्रवारी घराच्या छतावर सामुहिक नमाज पठण सुरू होती. ही सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथील नागरिकांना सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्यास सांगितले, पण यावेळी त्या लोकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला. यात पोलिस इंस्पेक्टरसोबत, एलआयू शिपाहीसह 4 पोलिस अधिकारी गंभीर जखमी झाले. यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या परिसरात पाठवण्यात आला. परंतू, यादरम्यान पोलिसांसोबत मारहाण करणारे आरोपी पळून गेले. यावेळे काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
धर्मगुरुंनी घरात नमाज पठण करण्यास सांगितले होते
मुस्लिम धर्मगुरुंनी गुरुवारी सर्व मुस्लिम नागरिकांना घरातच नमाज पठण करण्याची अपील केली होती. यावर अनेकांनी त्यांचे ऐकले. परंतू, काग्जियाल मोहल्लामधील साबिरच्या घरावर सामुहिक नमाजासाठी 25-30 लोक जमले होते. सुचना मिळताच हाजी शरीफ चौकी इंचार्ज आनंद पांडेय, एलआययू शिपाही राजवीर सिंह इतर पोलिसांसोबत त्या ठिकाणी गेले.
Post a Comment