जन्मदात्या बापाकडूनच अत्याचार
माय अहमदनगर वेब टीम
श्रीगोंदा - मुली घराबाहेर सुरक्षित नाहीत असं म्हंटले जाते पण जन्मदात्या बापाकडूनच आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार होत असतील तर मुली घरातही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. श्रीगोंदा शहरात देखील आपल्या पोटच्या १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या पित्यानेच अत्याचार केल्याची घटना दि २५ एप्रिल शनिवारी रात्री पीडित मुलीच्या घरी घडली.
पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नराधम बापाविरोधात अत्याचार व पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तात्काळ मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला जेरबंद केले आहे.
Post a Comment