नगरला आज रात्री पूर्ण लॉकडाऊन
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – शब्बे ए बारातच्या पार्श्वाुमीवर नगर आज रात्री पूर्ण लॉकडाऊन करत असल्याचे आदेश कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी काढले आहेत. अत्यावश्यक सेवेची दुकानेही बंद राहणार असून घरात राहूनच हा सण साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कोरोनाचा प्रार्दुााव टाळण्यासाठी देशासह अख्खे राज्य लॉकडाऊन करण्यातआले आहे. नगर शहरासह जिल्हाही 14 एप्रिलच्या रात्रीपर्यंत पूर्ण लॉकडाऊन आहे. मुस्लीम बांधवांचा शब्बे ए बारात हा सण असल्याने कलेक्टरांनी लॉकडाऊनची सुधारीत आदेश आज काढले. आज सायंकाळी सहापासून ते उद्या सकाळी सहापर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकाने बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे.
किराणा दुकान, दुध, दुग्धोत्पादन पदार्थ, फळे, भाजीपाला व मेडिकल दुकानेही या काळात चालू राहणार नाहीत असे आदेश कलेक्टरांनी दिले आहेत. उद्या सहा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची ही दुकाने बंद राहणार आहेत. तसे आदेश कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी काढले आहेत.
इबादत और विर्द…
इस्लामी दिनदर्शिकेतील शाबान हा आठवा महिना. या महिन्याची पंधरा तारखेची रात्र ही शबे बरात म्हणून साजरी केली जाते. बरात म्हणजे खुशी, आनंद. या रात्री सर्व भक्तांना अल्लाहतआलाकडून आनंद वार्ता प्राप्त होत असते. त्यासाठी या रात्री प्रार्थना (इबादत) केली जाते. यामध्ये नमाज पठण, कुरआन पठण केले जाते. याला तिलावत म्हणतात. अल्लाहचे नामस्मरण (विर्द) केले जाते. अल्लाहतआलाची 99 नावे आहेत. त्यांचा जप केला जातो. दुआ मागितली जाते.
Post a Comment