पोलिसांच्या निर्जंतुकीकरणासाठी नऊ व्हॅन
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – शहरासह जिल्ह्यात कर्तव्यावर असणाऱ्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांवर आता सॅनिटायझरर्सची फवारणी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस दलाने मोबाईल मिस्टिंग सॅनिटायझेशन व्हॅन तयार केल्या आहेत. जिल्ह्यात एकुण नऊ व्हॅन तयार करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दिली. त्यामुळे कामावर असणाऱ्या पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संचारबंदीची अमंलबजावणी करण्यासाठी पोलीस आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. त्यांचा कोरोना पासून बचाव करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी या निर्जंतुकीकरण व्हॅन तयार केल्या आहेत. दक्षिण व उत्तर विभागासाठी प्रत्येकी एक व जिल्ह्यातील सात उपविभागीय पोलीस विभागासाठी प्रत्येकी एक अशा नऊ व्हॅन असणार आहे. त्या त्या हद्दीत या व्हॅन फिरतीवर असणार आहे. व्हॅनमध्ये फवारणी पंपाचा उपयोग करून कर्मचाऱ्यांवर पाच ते सात सेकंद फवारणी केली जाते.
Post a Comment