15 एप्रिलला देशात एकाच वेळी लॉकडाऊन संपणार नाही
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - कोरोनाच्या परिस्थितीचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक आणीबाणी असे केले आहे. राजकीय पक्षांच्या संसदीय नेत्यांशी व्हीसीवर मोदी म्हणाले की, राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन व तज्ञांनी लॉकडाऊन वाढवण्याचे सांगितले आहे. या बैठकीत सहभागी बिजदचे खासदार पिनाकी मिश्रा यांच्या मते, १५ एप्रिलला लॉकडाऊन संपणार नसल्याचे संकेत पंतप्रधानांनी दिले. मात्र, अंतिम निर्णय शनिवारी होणाऱ्या बैठकीत होईल. देशात २५ मार्चपासून २१ दिवसांसाठी लागू केलेल्या लॉकडाऊनची मुदत १४ एप्रिलला संपते आहे. बैठकीत पंतप्रधान म्हणाले, देशात सामाजिक आणीबाणीसारखी स्थिती आहे. लॉकडाऊन १५ एप्रिलपासून एकाच वेळी संपणार नाही. संसर्गाचा वेग नियंत्रित असलेल्या निवडक देशांपैकी भारत एक आहे. आपल्यासाठी हा संयमाचा काळ आहे. संयम ठेवल्याने स्थिती सुरळीत होईल.
Post a Comment