गेल्या वेळी अव्वल असलेल्या मुकेश अंबानींची दुसऱ्या स्थानी घसरण
माय अहमदनगर वेब टीम
न्यूयॉर्क - फोर्ब्जने जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघ मालकांची यादी जाहीर केली. गतवर्षी अव्वल राहिलेल्या मुकेश अंबानींची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. मायक्रोसाॅफ्टचे सीईओ राहिलेले स्टीव्ह बालमर पहिल्या स्थानी विराजमान झाले. बालमर यांची कमाई २८ टक्क्यांनी वाढली आणि अंबानींची २६ टक्क्यांनी कमी झाली.
रोमन अब्रामोविच गेल्या गत टाॅप-५ मध्ये होते
अमेरिकन डेव्हिड टेपर सहाव्या स्थानी आहे. अमेरिकन फुटबॉल टीम कॅरोलिना पँथर्सच्या मालकाची कमाई ९१ हजार कोटी रुपये आहे. इस्रायली-रशियन अब्जोपती रोमन अब्रामोविच ८६ हजार कोटी रुपयांच्या कमाईसह सातव्या स्थानी पोहोचले.
अमेरिकन अब्जोपती स्टेनले ५ संघांचे मालक
अमेरिकेचे ७२ वर्षीय अब्जोपती व्यावसायिक स्टेनले क्रोएंकेचा सोर्स ऑफ वेल्थ स्पोर्ट््स व बांधकाम व्यवसाय आहे. त्यांची कमाई १० बिलियन डॉलर (७६ हजार कोटी रुपये) आहे. ते अनेक संघांचे मालक आहेत. ते सर्वात श्रीमंत क्रीडा संघ मालकांमध्ये नवव्या स्थानी आहेत.
Post a Comment