महाराष्ट्र कोरोना / राज्यात एकाच दिवसात आढळले 120 नवीन रुग्ण; मृतांचा आकडा 49 वर
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - देशात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.सर्वात वाईट परिस्थीती महाराष्ट्राची आहे. राज्यात आज एकाच दिवसात120 नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत राज्यातील संक्रमितांचा आकडा 868 झाला आहे.
यापैकी19 रुग्ण पुणे, 57 मुंबई, 1-1 सातारा, अहमदनगर आणि वसईचा आहे. नाशिकमध्ये अजून एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.तर मुंबईजवळील वसई-विरारच्या नालासोपारा परिसरात एका 65 वर्षीय संक्रमिताचा मृत्यू झाला आहे. बारामतीमध्येही आज एकास कोरोना संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांचे कुटुंबिय भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे अनेक लोकांना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बारामती शहरातील दुसरा रूग्ण आहे. यासोबतच राज्यातील मृतांचा आकडा 49वर गेला आहे.
सर्वात जास्त113 रुग्ण रविवारी समोर आले होते.रविवारीच सर्वात जास्त13 रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी9 मुंबई एमएमआरडीएचे, 3 पुणे आणि 1 औरंगाबादचा होता. शनिवारी राज्याची कोरोना बाधित रुग्ण संख्या 635 इतकी होती. रविवारी ती 748 गेली. आतापर्यंत राज्यातील एकूण 56 कोरोना बाधित रुग्णांना बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहे. राज्यात आजतागायत 16 हजार 8 इतक्या संशयितांची कोरोना चाचणी घेतली गेली आहे. 14 हजार 837संशयितांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. 46 हजार 586 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
Post a Comment