राज्यात आतापर्यंत एकूण 840 रुग्ण कोरोनामुक्त झाले



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यात मागील 24 तासांत 778 नव्या रुग्णांची नोंद झाली. यासोबतच राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 6 हजार 427 झाली आहे. गुरुवारी कोरोनामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला. यात मुंबईतील सर्वाधिक 6 रुग्णांचा बळी गेला. यासोबत मुंबईतील मृतांचा आकडा 167 वर पोहोचला आहे. पुण्यात 5, नवी मुंबई, धुळे आणि नंदुरबारमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश होता. यातील 2 रुग्णांचे वय 60 वर्षांपुढे होते. तर 7 रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा आणि हृदयाशी संबंधीत आजार होता.

राज्यात आतापर्यंत 840 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे राज्यभरात आतापर्यंत 283 लोकांना प्राण गमवावे लागले. 1 लाख 14 हजार 398 लोकांना घरात आणि 8 हजार 702 लोकांना इतर ठिकाणी क्वारंटाइन करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 99 हजार 369 लोकांची तपासणी झाली आहे. यातील 89 हजार 561 लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post