पीएम मोदींनी दिले संकेत- 14 एप्रिलनंतर देशातील संपूर्ण लॉकडाउन एकदाच उठणार नाही;



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली -  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फ्रंसिंगद्वारे एनडीए आणि विरोधी पक्षातील 16 खासदारांसोबत कोरोना संकटावर चर्चा केली. बैठखीनंतर बीजद खासदार पिनाकी मिश्रा म्हणाले की, 'लॉकडाउन एकदाच उठणार नसल्याचे नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे. कोरोना संक्रमाणानंतरच देशातील परिस्थिती आधीसारखी नसेल.' याशिवाय 5 राज्य मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगाणा आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन वाढवला जाण्याची मागणी केली आहे.
मोदी 11 एप्रिलला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
मोदींसोबतच चर्चेत काँग्रेस गुलाम नबी आजाद, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंधोपध्याय, शिवसेनेचे संजय राउत, बीजदचे पिनाकी मिश्रा, राष्ट्रवादीचे शरद पवार, सपाचे रामगोपाल यादव, शिरोमणि अकाली दलचे सुखबीर सिंह बादल, बसपाचे सतीश चंद्र मिश्रा, वायएसआरसीपीचे विजय साई रेड्‌डी, मिथुन रेड्‌डी आणि जदयूचे राजीव रंजन यांच्यासह अनेक खासदार होते. काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, सरकार लॉकडाउनला 14 एप्रिलनंतर वाढवू शकते. पहिल्यांदाचा मोदींनी विरोधी नेत्यांसोबत कोरोनावर चर्चा केली. यापूर्वी त्यांनी सर्व राज्याचे मुख्यमंत्री क्रिकेटर्स, फिल्मस्टार आणि मीडियातील लोकांशी चर्चा केली आहे. येत्या 11 एप्रिलला मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post