केजरीवालांचा दावा- मोदींनी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला!
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - मोदींनी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्यानुसार, देशभरातील लॉकडाउन 14 एप्रिलनंतरही 30 एप्रिलपर्यंत वाढवला जाऊ शकतो. तत्पूर्वीपंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यामध्ये लॉकडाउन आणि कोरोनावर चर्चा झाली. यापूर्वी 20 मार्च आणि 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांसोबत मोदींनी संवाद साधला होता. कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी पंतप्रधानांनी 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाउन जारी केला. तो लॉकडाउन 14 एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे. यावेळी आपण मदतीसाठी आठवड्याचे सात दिवस आणि दिवसाचे 24 तास उपलब्ध आहोत असे मोदी म्हणाले आहेत.
Post a Comment