तिसरी स्टेज नाही; राज्यात अद्याप सामुदायिक संसर्ग नाही : आराेग्यमंत्री टोपे
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- राज्यात बुधवारी कोरोनाच्या ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णांची संख्या ११३५ वर गेली आहे. बुधवारी कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू नोंद झाला. यापैकी ५ मुंबई, २ पुणे, १ कल्याण -डोंबिवलीचा आहे. राज्यात एकूण बळींचा आकडा ७२ वर पोहोचला आहे. दरम्यान, कोरोनाबाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ९४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची तिसरी स्टेज राज्यात सुरू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तथापि, ही तिसरी स्टेज नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. आजपर्यंत २७ हजार ९० नमुन्यांपैकी २५,७५३ जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले. ११७ बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ३४ हजार ९०४ व्यक्ती घरगुती अलगीकरण, तर ४४४४ जण संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत.
Post a Comment