इटली / काेराेनाचे गंभीर रुग्ण घटले; मृतांचा आकडाही कमी झाला
माय अहमदनगर वेब टीम
रोम - कोरोना विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू इटलीत झाले आहेत. येथे आतापर्यंत १५ हजारांपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. शनिवारीही या विषाणूमुळे ६८१ जणांचा मृत्यू झाला. ताज्या आकडेवारीवरून येथील स्थिती हळूहळू सुधारत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. पहिल्यांदा इन्टेसिव्ह केअर युनिटमध्ये दाखल रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. इटलीचे नागरिक सुरक्षा विभागाचे प्रमुख अंगेलो बोर्रेली यांनी सांगितले की, शुक्रवारी गंभीर रुग्णांची संख्या ४ हजार ६८ वरून कमी होत ३ हजार ९९४ झाली. कोरोनाविरोधातील लढाईतील हा महत्त्वाचा टप्पा आहे. या वेळी ३.३% च्या दराने संसर्ग पसरत आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. आतापर्यंत २० हजार ९९६ जण बरे झाले आहेत. सुमारे अर्धे बाधित इटलीतील लोम्बार्डी राज्यातील आहेत. बोर्रेली यांच्यानुसार ही आमच्यासाठी महत्त्वाची आकडेवारी आहे. पहिल्यांदाच गंभीर रुग्णांची संख्या कमी झाली आहे. यामुळे आमच्या रुग्णालयांवरील भार कमी होईल. जेव्हापासून आम्ही आपत्काळ जाहीर केला आहे तेव्हापासून पहिल्यांदाच गंभीर रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मृतांचा आकडाही घटला आहे. २४ तासांत ६८१ रुग्ण आले, तर २७ मार्चला हा आकडा सुमारे १ हजारापर्यंत गेला होता.
Post a Comment