टायगरला कृतिचे उत्तर, म्हणाली -‘ तू कधी आणि कोणत्या चित्रपटासाठी मला विचारले होते'



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - टायगर श्रॉफ आणि कृति सेननने ‘हिरोपंती’मधून पदार्पण केले होते. आता टायगर ‘हिरोपंती 2’ मध्ये दिसणार आहे. अलीकडेच एका लाइव्ह चॅटदरम्यान टायगरला ज्यावेळी पुन्हा कृति सेननसोबत काम करण्याबाबत विचारले तर तो म्हणाला... ‘मला कृतिसोबत पुन्हा काम करायचे आहे, परंतु ती आता मोठी स्टार आहे ती माझ्यासारख्या अभिनेत्यासोबत काम कसे करेल. सध्यातरी आमच्याकडे एकत्र काम करण्यासाठी चांगली स्क्रिप्ट नाही. एकदा कथानक तयार झाले की आम्हाला नक्कीच एकत्र काम करायला आवडेल.’

टायगरच्या या वक्तव्यावर कृतिने ट्विट करुन उत्तर दिले. तिने ट्विट केले, ’हे तो सुपरस्टार म्हणतो आहे, जो 100 कोटींपेक्षा कमी कमाई करणारा चित्रपट करत नाही. तू कधी आणि कोणत्या चित्रपटासाठी मला विचारले होते. असो, पण माझ्यासोबत काम करणे तुझ्यासाठी चांगले असेल.‘

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post