धाेनीमुळेच मिळाली विराट प्रसिद्धी आणि ग्लॅमर : काेहली



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीमुळेच मला क्रिकेटमध्ये विराट अशी प्रसिद्धी आणि ग्लॅमर मिळाले. प्रथमश्रेणी क्रिकेटदरम्यान काेचने माझे नामकरण चिकू असे केले हाेते. मात्र, धाेनीमुळे मला या नावाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक मिळवून देता आली, अशा शब्दांत टीम इंडियाचा कर्णधार काेहलीने आपला यशस्वी करिअरचा प्रवास इन्स्टाग्रामवर पीटरसनसाेबत लाइव्ह चॅट करताना कथन केला.

‘२००७ मध्ये रणजी ट्राॅफीमध्ये मी दिल्लीचे प्रतिनिधित्व करत हाेताे. यादरम्यान खेळताना प्रकृती सुदृढ हाेती. त्यामुळे काेच मला चिकू नावानेच आवाज देत हाेते. त्यानंतर हेच टाेपणनाव कायम राहिले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना यष्टिरक्षक धाेनीही मला चिकू नावानेच आवाज देत हाेता. स्टम्प माइकमुळे हे नाव सर्वांच्या कानी पडले,असे ताे म्हणाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post