अमेरिकेतील 25 शहरात कर्फ्यू
माय अहमदनगर वेब टीम
वॉशिंग्टन - अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील मिनेपोलिस शहरात पोलिस कोठडीत कृष्णवर्णय जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर 30 शहरात निदर्शने होत आहेत. अनेक शहरात शनिवारी रात्री पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. लॉस एंजिल्स, फिलाडेल्फिया आणि अटलांटासह 16 राज्यातील 25 शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्या, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलकांना इशारा देत म्हटले की, आमच्याकडे प्राणघातक कुत्री आणि शस्त्रे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत संपूर्ण अमेरिकेतून 1,400 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. निदर्शनाच्या दोन दिवसादरम्यान मिनेसोटामध्ये ताब्यात घेतलेल्या आंदोलकांमध्ये 80% मिनेपोलिसमधील आहेत. मिनेसोटामध्ये गुरुवारी दुपारपासून शनिवारपर्यंत दंगल, चोरी, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याच्या आरोपात 51 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील 43 मिनेपोलिसचे आहेत. निदर्शनादरम्यान, फिलाडेल्फियामध्ये 13 पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिस कमिश्नर डेनिएल आउटलॉ यांनी सांगितले की, निदर्शनादरम्यान पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. यानंतर 14 जणांना ताब्यात घेण्यात आले.
आंदोलकांनी व्हाइट हाउसच्या बाहेर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात प्रदर्शन केले, त्यानंतर याला बंद करण्यात आले. शनिवारीदेखील आंदोलक व्हाइट हाउसच्या बाहेर जमा झाले. यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. दरम्यान, ट्रम्प यांनी व्हाइट हाउसची सुरक्षा करणाऱ्या अमेरिकेच्या सीक्रेट सर्विस अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
Post a Comment