...लॉकडाऊन नसते तर 30 लाख रुग्ण असते : केंद्र


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशात शुक्रवारी आतापर्यंतचे सर्वाधिक ६,३६१ नवे कोरोना रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या आता १,२२,६५६ झाली आहे. दरम्यान, सरकारने सांगितले की, लॉकडाऊन नसते तर रुग्णांची संख्या ३० लाखांपर्यंत पोहोचली असती. विविध अहवालांचा हवाला देत अधिकाऱ्यांनी दावा केला की, देशात वेळेवर लॉकडाऊन नसते तर २.१ लाख बळी गेले असते.
रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती आहे. राज्यात एका दिवसांत आजवरचे सर्वाधिक २९४० रुग्ण आढळले. दिल्लीतही शुक्रवारी आतापर्यंतचे सर्वाधिक ६६० रुग्ण आढळले. येथे एकूण १२,३१९ लोक बाधित आहेत, तर २०८ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये ३६३ नवे रुग्ण आढळले. यापैकी २७५ तर अहमदाबादेतच आढळले आहेत. याशिवाय तामिळनाडूत ७८६, बिहार मध्ये ११८ आणि उत्तर प्रदेशात १५२ नवे रुग्ण आढळले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post