या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी 31 ऑक्टोबरआधी करावा लागेल अर्ज
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - कोरोना विषाणू संसर्गाच्या फटक्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी जाहीर केलेल्या ३ लाख कोटींची इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी योजने(ईसीएसजीएस)स बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यासोबत अर्थ मंत्रालयाने योजनेशी संबंधित सविस्तर माहिती दिली.या योजनेअंतर्गत सर्व एमएसएमई पात्र असतील, ज्यांच्यावर २५ कोटींपर्यंत कर्ज थकीत आहे. खेळत्या भांडवलाच्या रूपात मुदत कर्ज दिले जाईल. या कर्जाचे प्रमाण एकूण कर्जाच्या जास्तीत जास्त २० टक्क्यांसमान असेल. नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी लिमिटेडबँकांना या कर्जासाठी १०० टक्के हमी देईल. भारत सरकार योजनेसाठी या वर्षी आणि पुढील वर्षी एकूण ४१,६०० रु. जारी करेल. या योजनेअंतर्गत कर्ज ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत किंवा ३ लाख कोटी रुपयांची मंजुरी मिळेपर्यंत(जे आधी येईल) वाटले जाईल. जवळपास ४५ लाख एमएसएमईंना या योजनेअंतर्गत अतिरिक्त निधी मिळेल. संबंधित योजनेसाठी घेतलेल्या कर्जाला ४ वर्षांत पेमेंट करावे लागेल.
अन्य निर्णय असे
> कोळसा खाणींच्या लिलावासाठी नवे नियम, ब्लॉक्सला मंजुरी. सरकारने मागील काळात कोळसा खाणी खासगी क्षेत्राला व्यावसायिक वापरासाठी खुल्या करण्याची घोषणा केली होती.
> नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या (एनबीएफसी) आणि हाउसिंग फायनान्स कंपन्यांना रोख वाढवण्यासाठी विशेष लिक्विडिटी योजनेला मंजुरी.
> मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेससाठी १० हजार कोटी रुपये मंजूर.
> ८ कोटी प्रवाशांना पुढील दोन महिन्यांपर्यंत रेशन मोफत.
> मासेमारांच्या फायद्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला मंजुरी.
> जम्मू-काश्मीरमध्ये प्रशासकीय सेवांमध्ये नियुक्तीसाठी नवीन नियमांतर्गत जारी मूळ रहिवासी प्रमाणपत्राच्या नियमावलीशी संबंधित प्रशासकीय आदेश जारी करण्यास मंजुरी.
किती असेल व्याज :
बँक आणि वित्तीय संस्था या कर्जासाठी जास्तीत जास्त ९.२५ टक्के व्याज आणि एनबीएफसी जास्तीत जास्त १ टक्के व्याज या कर्जावर वसूल करू शकतील. यासाठी कोणतेही हमी द्यावी लागणार नाही.
स्पेशल मेन्शन अकाउंट
एसएमए -0 : एखाद्या खात्यात घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर व मुद्दल त्याच्या देय होण्याच्या ३० दिवसांच्या आत केल्यास अशा खात्यास एमएमए ० च्या रूपात वर्गीकृत केले जाते.
एसएमए -१ :
कर्जाच्या व्याज किंवा मुद्दल त्याच्या देय होण्याच्या तिथीपासून ३१ दिवसांपासून ६० दिवसांच्या आत केले असेल तर एमएमए-१ च्या रूपात होते.
किती कर्ज मिळेल :
बहुतांश कर्ज उद्योजकांवर थकबाकीच्या एकूण कर्जाच्या २०% समान होईल. उदाहरणार्थ एखाद्या उद्योजकाने १ कोटी कर्ज घेतले होते आणि त्यावर २९ फेब्रुवारीला ८० लाख कर्ज थकीत असेल तर त्याला जास्तीत जास्त १६ लाख कर्ज मिळेल.
हे एमएसएमई पात्र असतील
> ज्यांची उलाढाल १०० कोटींपेक्षा कमी व २९ फेब्रुवारी २०२० रोजी थकीत कर्ज २५ कोटींपेक्षा कमी होते, असे एमएसएमई किंवा मुद्रा कर्जधारक पात्र असतील. याशिवाय एमएसएमईच्या २९ फेब्रुवारी २०२० आधी ६० दिवसांपर्यंत बँकेत खात्याचे नियमित संचालन केले असेल आणि त्यांचे खाते स्पेशल मेन्शन अकाउंट एसएमए ० किंवा एसएमए १ च्या रूपात वर्गीकृत असावे.
Post a Comment