आठवडाभरात बळींचा आकडाही 442 ने वाढला


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - सलग दुसऱ्या दिवशी राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या अडीच हजाराने वाढली आहे. शनिवारी २६०८ नव्या रुग्णांसह एकूण संख्या ४७१९० वर पोहोचली आहे. शनिवारी ६० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. एकूण बळींची संख्या १५७७ वर गेली आहे. राज्यात शनिवारी ८२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्या १३,४०४ झाली आहे. सध्या राज्यात ३२,२०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
आठवडाभरात बळींचा आकडाही ४४२ ने वाढला
शनिवार, १६ मे रोजी राज्यात एकूण रुग्णसंख्या ३०,७०६ तर बळींचा आकडा ११३५ इतका होता. २३ मेपर्यंतच्या ८ दिवसांत रुग्णसंख्या १६,४८४ तर बळींचा आकडा ४४२ ने वाढला आहे. राज्यात १६ मेपर्यंत ७,०८८ रुग्ण कोरोनातून बरे झाले होते. ही संख्या २३ मेपर्यंत ६,३१६ ने वाढून १३,४०४ वर गेली आहे.

> 3 लाख 48,026 आजवर चाचण्या
> 2 लाख 98,696 संशयित निगेटिव्ह
> 4 लाख 85,623 नागरिक होम क्वाॅरंटाइनमध्ये
> 33 हजार 545 नागरिक संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये

रुग्णांचा तपशील
मुंबई मनपा २८८१७, ठाणे ३९४, ठाणे मनपा २४०५, नवी मुंबई १८७८, कल्याण -डोंबिवली ७८४, उल्हासनगर १४५, भिवंडी-निजामपूर ८२, मीरा-भाईंदर ४४२, पालघर १११, वसई-विरार ४९९, रायगड ३२१, पनवेल २९५, नाशिक मंडळ १५३५, पुणे मंडळ ६११८, कोल्हापूर मंडळ ४५५, औरंगाबाद मंडळ १४०७, लातूर मंडळ २२०, अकोला ६८९, नागपूर ५४५, इतर ४८.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post