अहमदनगरकरांना पुन्हा दिलासा ; ९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह


आणखी ११ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवले
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी ०९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव आले आहेत. आज पुन्हा ११ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

कल पाठविण्यात आलेल्या अहवाला पैकी ०४ अहवाल येणे बाकी होते. त्यातील एक अहवाल सकाळी प्राप्त झाला. उर्वरित ०३ व्यक्तींचे स्त्राव पुन्हा पाठविण्यास सांगितले. याशिवाय इतर आठ व्यक्तींचे अहवाल आज सकाळी पाठविण्यात आले होते. ते अहवालही निगेटिव्ह आले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post