एकाच कुटुंबातील 5 जणांसह 14 कोरोना जणांना कोरोनाची लागण


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यात आज एकाच कुटुंबातील पाच जणांसह 14 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहे. जिल्ह्यातील कोरोना बधितांचा आकडा 131 वर पोहोचला आहे.

जिल्ह्यातील ०६ रुग्ण कोरोनामुक्त
अहमदनगर जिल्ह्यातील आणखी ०६ रुग्ण बरे होऊन परतले घरी.नगर शहरातील ०३ पाथर्डी, संगमनेर येथील प्रत्येकी ०१ आणि संगमनेर येथीलच नाशिक येथे उपचार घेत असलेला रुग्णही बरा. जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ६८.

आज दिवसभरात जिल्ह्यात १४ नवीन रुग्ण.
*नगर शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती कोरोना बाधीत. यात एक महिला आणि ०४ पुरुष. सथ्था कॉलनीतील हे कुटुंब.

*संगमनेर येथील दोन व्यक्तींचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह

*राशीन (कर्जत) येथील ७० वर्षीय पुरुष आणि १४ वर्षीय मुलगी बाधीत. कालच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील.

*संगमनेर येथील एकाच कुटुंबातील १३ आणि १७ वर्षीय मुले बाधित. कालच्या बाधित रुग्णाचे नातेवाईक.

*शिर्डी येथील ५५ वर्ष वयाची महिला बाधित. निमगाव येथील बाधित महिलेच्या संपर्कात आली होती.

*घाटकोपर येथून धामणगाव पाट (अकोले) येथे आलेला ४९ वर्षीय व्यक्ती बाधित

*भांडुप येथून कारेगाव (नेवासा) येथे आलेला ३५ वर्षीय युवक बाधित.

*जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १३१*
(महानगरपालिका क्षेत्र २३, अहमदनगर जिल्हा ६७, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ३१)

*जिल्हयातील ऍक्टिव्ह केसेस ५० (+०१ नाशिक, +०२संगमनेर)*

* एकूण स्त्राव तपासणी २३१७

निगेटीव २१४४ रिजेक्टेड ०२५ निष्कर्ष न निघालेले १५ अहवाल बाकी ०२

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post