'बुथ'ला भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची मदत


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर ः नगर शहर व जिल्ह्यात रोगराईचे मोठे संकट आल्यावर नेहमी उपयोगी पडण्याचा बुथ हॉस्पिटलचा इतिहास आहे. या हॉस्पिटलने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवरही उपचारात महत्त्वाची भुमिका बजावली. या हॉस्पिटलला भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या 2001-2002च्या इयत्ता दहावीच्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी एक लाख रुपयांची मदत दिली आहे.

जिल्ह्यात प्लेग पासून विविध साथीचे रोग आल्यावर नेहमी बुथ हॉस्पिटल समाजाला उपयोगी ठरले आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यातही या हॉस्पिटलने स्वतःहून पुढाकार घेतला. या समाजसेवेतील सद्दैव तत्पर असलेल्या हॉस्पिटलला मदत करावी या हेतूने भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांनी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. देवदान कळकुंबे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना या हॉस्पिटलमध्ये कोरोना विषयक काम करत असताना कोणत्या वस्तूंची कमतरता आहे. या बाबत चर्चा केली. या माजी विद्यार्थ्यांत अनेक जण वकील, डॉक्‍टर, इंजिनिअर, व्यावसायिक क्षेत्रातील आहेत. त्यांनी सुमारे एक लाख रुपये गोळा केले. या पैशातून डिजिटल थर्मामीटर, वॉटर कुलर, वॉटर प्युरिफायर, एन 95 मास्क, पल्स मीटर, फॉगर मशीन, सॅनिटायझर स्टॅन्ड आदी साहित्य खरेदी केले. या साहित्याची मदत डॉ. कळकुंबे यांना आज बुथ हॉस्पिटलमध्ये सुपूर्द करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थी असलेले ऍड. हर्षद कटारिया, सम्राट होसिंग, अंगद गोहाट, चैतन्य लाळे, डॉ. राहुल झंवर, अक्षय गांधी आदी उपस्थित होते.

ऍड. कटारिया म्हणाले, सामाजिक भावनेतून भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या 2001-2002 बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र आलो. बुथ हॉस्पिटल जिल्ह्यात कोरोना विरुद्धच्या लढ्यात महत्त्वाची भुमिका बजावत आहे. त्यांना या कामात आम्ही मदत केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post