दारू पिणाऱ्यांना मोठा दिलासा; 'या' ठिकाणी दारुची दुकाने सुरू होणार
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - केंद्र सरकारने दारुची दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रेड झोनमध्ये दारुची दुकाने खुली होणार की नाही हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र आज राज्य सरकारने सर्व झोनमध्ये दारुची दुकाने सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून दारुची दुकाने सुरू करण्याची मागणी करणाऱ्या तळीरामांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र सरकारने ही दुकाने सुरू करण्यासाठी एक नियमावलही तसेच सर्व झोनमध्ये कोणकोणती दुकाने सुरू होणार याची एक यादी जारी केली आहे.
रेड झोनमध्येही दारुची दुकाने सुरू होणार असली तरी एमएमआर (मुंबई महामंडळ) व पीएमआर (पुणे महामंडळ) या भागात कडक नियम लागू करण्यात आले आहेत.
– दारुची दुकाने ही फक्त एकच व्यक्ती एका वेळी उभी राहू शकते अशा प्रकारे सुरू करायची आहेत.
– मॉल व फुड प्लाझामधील दारुची दुकाने बंदच राहणार आहेत.
– एका लेनमध्ये अत्यावश्यक सेवेत न येणाऱी फक्त पाच दुकानेच सुरूच राहतील
– दारुच्या दुकानांची वेळ ही स्थानिक प्रशासनाकडून तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन ठरविण्यात येईल
– कोणतेही रेस्टॉरंट व बार सुरू होणार नाहीत.
– सर्व दुकानांवर सोशल डिस्टंसिंग पाळणं बंधनकारक राहिल
– कंटेनमेंट झोनमधील दारुची दुकानं बंदच राहणार आहेत.
Post a Comment