अहमदनगरकरांच्या डोक्याला पुन्हा ताप ; पाथर्डी तालुक्यातील ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण


जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या ४४
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेला या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती शेतमाल घेऊन मुंबईला गेल्याचे स्पष्ट झाले असून त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ४४ झाली आहे.

दरम्यान, गेल्या ५-६ दिवसानंतर जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने जिल्ह्याच्या सीमेवरील नाकेबंदी कडक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post