भावानेच बहिणीचे अपहरण करून केला बलात्कार!
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. नराधम भावाने चुलत बहिणीचेच अपहरण करून बलात्कार केल्याने श्रीगोंदा तालुक्यात खळबळ माजली आहे. भाऊ-बहिणीचे नाते सगळ्यात श्रेष्ठ, पवित्र मानले जाते. मात्र, श्रीगोंदा तालुक्यात चुलत भावाने बहिणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सोळा वर्षीय अल्पवयीन चुलत बहिणीला प्रेमाचे आमिष दाखविले आणि फूस लावून कोळगाव ता. श्रीगोंदा येथून पळवून नेले. दौंड येथील जुन्या बसस्थानकात रात्रीच्या वेळी बलात्कार केला. बेलवंडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद माने यांच्या टीमने आरोपीला जेरबंद करून मुलीला आईच्या ताब्यात दिले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील १८ वर्षीय आरोपीने त्याच्या चुलत बहिणीला पळवून नेले. पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली. पोलिस निरीक्षक माने यांनी माहिती घेतली आणि दौंड गाठले. त्या आरोपीने चुलत बहिणीवर बलात्कार केल्याचे मुलीने सांगितले. पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतला आहे. अपहरण, बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.
Post a Comment