आमची उपासमार थांबवा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- कोरोना या महारोगाने जगला विळखा घातला आहे. यातच अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातच शहरातील कामगार व लहान दुकानादार यांची मोठ्या प्रमाणात उपासमार होत आहे. लहान दुकानदारांची उपासमारी टाळण्यासाठी आयुक्तांनी लहान व्यवसाय यांना परवागनी द्यावी अशी माणगी नगर जिल्हा पान असोसिएशेनच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी अहमदनगर पान असोसिएशनचे फैयाज तांबोळी,साजिद जाहागिरदार, राजु शिंदे, अक्षय सब्बन, तुषार मेहत्रे, ज्ञानेश्वर मोळक, मोहन भापकर, सतिष डागवाले, सुनिल आवटी, आदी उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, केंद्र सरकारने लोकडॉऊन 3 मधेच सामाजिक अंतर ठेऊन दारु व तंबाखू दुकाने चालू ठेवण्याची परवानगी दिल्याने अनेक राज्यात ती चालु आहे. महाराष्ट्रात मात्र, सर्वच झोनच्या दारु व होम डिलेव्हरी चालू आणि ग्रीन ऑरेज झोनची पान दुकान व जनरल स्टोअर्स दुकाने बंद असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात करोनाचा फौलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे आवाहनास 100 प्रतिसाद देत लॉकडाऊन 1,2, 3 च्या काळात बंद ठेवली होती. या 45 दिवसात दुकाने बंद असल्याने सर्व दुकानदारांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट व दयनीय झालेली आहे. यातुन अनेकांची आज उपासमार होत आहे. तसेच दुकाने सुरु करण्या बाबत अद्यापही काही विचार झालेला नसल्याने स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांनी आम्हाला परवानगी द्यावी असे निवेदनात म्हंटले आहे.
सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय करण्यासाठी आम्हाला परवनगी द्यावी असेही निवेदनात म्हंटले आहे. या अगोदरही छोट्य व्यवसायीकांनी लोकप्रतिनिधींना साकडे घातले होते की आपचे व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी मिळवून द्यावी असे म्हंटले आहे.
Post a Comment