जागरूक नागरिक मंचाचा उपक्रम ; गांधीगिरी करत पत्रकार चौकात बसविले सोलर रिफ्लेक्टर कॅट आय
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – शहरात लॉकडाऊन असल्याने सर्वप्रकारची वाहतूक बंद असल्याने महामार्गांवर वर्दळ नाहीये, अशा परिस्थितीमध्ये रस्त्यांच्या दुरुस्तीचे व सोईसुविधांचे कामे वास्तविक प्रशासनाने व रस्ता सुरक्षा समितीने हाती घेऊन एव्हाना संपवायला हवी होती. याबाबतचे पत्र व निवेदन जागरुक नागरिक मंचाकडून सुहास मुळे यांनी जिल्हाधिकारी, मनपा व महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग यांना देऊन लॉकडाउनमध्ये करता येण्यासारखी कामे सुचवली होती होते. मात्र जिल्हा व मनापा प्रशासनाने त्याची दखल न घेता शहरातल्या मध्यवस्तीतील वर्षानुवर्षे रखडलेली महत्त्वाची कामे मार्गी लावण्यासाठी लॉकडाउन सारख्या सुवर्णसंधी मध्येही प्रयत्न करायची इच्छाशक्ती दाखवली नाही. याचा निषेध जागरूक नागरिक मंच्याच्या वतीने अनोख्या गांधीगिरीने केला. महाराष्ट्र दिनाचे औचीत्त साधून पत्रकार चौकात रस्त्यावर लॉककडाऊन संधीचा सदुपयोग करून चौकाच्या चारही दिशांना सोलर रिफ्लेक्टर कॅट आय जागरूक नागरीक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी स्वतः खड्डे घेऊन लावले. त्यांना मंचाच्या सदस्यांनी, वाहतूक शाखेचे निरिक्षक अविनाश मोरे, पो.कॉ. डोळे, गवळी यांनी मोलाचे सहकार्य केले. लोकसहभागातून सोलर रिफ्लेक्टर कॅट आय उपलब्ध करण्यात आले.
जगारिक नागरिक मंचाच्या वतीने या आधीही शहरातील विविध प्रमुख चौकात सीसीटीव्ही क्यामेरे, सोलर रिफ्लेक्टर कॅट आय बसवून सामाजिक दावित्व्य निभावले आहे. पत्रकार चौकात रणरणत्या उन्हात जागरूक नागरिक मंच्याच्या सदस्यांनी छन्नी हातोडयाने खड्डे घेऊन सोलर रिफ्लेक्टर कॅट आय बसवण्यात आले. यावेळी प्रा.सुनील पंडित, कैलास दळवी, पै.भैरवनाथ खंडागळे, सुनील कुलकर्णी, बापूसाहेब ठाणगे, बी.यु. कुलकर्णी, योगेश गणगले, निर्मला भंडारी, राजू पडोळे, शिरसाठ सर यांनी चौकाच्या चारही दिशांना सोशल डिस्टन्सिंगचा नियम पळून यशस्वी उपक्रम राबवला. तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक मुलानी व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Post a Comment