'महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा'


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई. राज्यातील ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे. आज नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली, त्या दरम्यान त्यांनी ही मागणी केली आहे.

ठाकरे सरकार कोरोनाचे संकट हाताळू शकत नाही, त्यांच्यात क्षमता नाही. कोरोनाचा सामना करण्यास सरकार अपयशी ठरलं आहे, त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post