महिलांच्‍या आरोग्‍याची तपासणी करणे ही काळाची गरज - आ. संग्राम जगताप


कै.बाळासाहेब देशपांडे दवाखाना येथे अत्‍याधुनिक सोनोग्राफी मशिनचे उदघाटन

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अहमदनगर महानगरपालिकेच्‍या कै.बाळासाहेब देशपांडे दवाखाना येथे नगर जिल्‍हयाला चांगल्‍या दर्जेची आरोग्‍य सेवा दिली आहे. महिला प्रसुती मध्‍ये बाळासाहेब देशपांडे हॉस्‍पीटल हे नगर जिल्‍हयामध्‍ये चांगल्‍या दर्जेचे हॉस्‍पीटल म्‍हणून आजही ओळख आहे. महिला आपल्‍या दैनंदिन कामामुळे आपल्‍या आरोग्‍याकडे कायमच दुर्लक्ष करित असतात. महिलांच्‍या आरोग्‍याची तपासणी वारंवार होणे गरजेचे आहे. आजच्‍या आधुनिक युगामध्‍ये नवनविन आरोग्‍य क्षेत्रामध्‍ये तंत्रज्ञान उपलब्‍ध झाले आहे. या तंत्राचा उपयोग करून नागरिकांना चांगल्‍या दर्जाची आरोग्‍य सेवा देण्‍यात यावी या पार्श्‍वभूमीवर सुपा एमआयडीसी येथील करिअर कंपनी लि. यांच्‍या वतीने युवान संस्‍थेच्‍या माध्‍यमातून सुमारे 16 लाख रूपयाची अत्‍याधुनिक कलर डॉपलेट सोनोग्राफी मशिन बाळासाहेब देशपांडे हॉस्‍पीटलला भेट देण्‍यात आली याबद्दल मी कंपनीचे आभार मानतो यामुळे नगर शहरातील व जिल्‍हयातील महिलांच्‍या आरोग्‍याचा प्रश्‍न मोफत मार्गी लागेल असे मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप म्‍हणाले.

कै.बाळासाहेब देशपांडे दवाखाना येथे सुपा एमआयडीसी येथील करिअर कंपनी लि. यांच्‍या वतीने युवान संस्‍थेच्‍या माध्‍यमातून सुमारे 16 लाख रूपयाची अत्‍याधुनिक कलर डॉपलेट सोनोग्राफी मशिनचे उदघाटन मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप व मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांचे शुभहस्‍ते सपंन्‍न झाला. यावेळी उपमहापौर मा.सौ.मालनताई ढोणे, नगरसेवक मा.श्री.समद खान मा.श्री.अजय चितळे, मा.श्री.भा कुरेशी, मा.श्री.उबेद शेख, उपायुक्‍त श्री.प्रदिप पठारे, आरोग्‍याधिकारी डॉ.अनिल बोरगे, वैद्यकिय अधिकारी डॉ.सतिष राजूरकर, डॉ.वृषाली पाटील, डॉ;शिल्‍पा पाठक, डॉ.दिपमाला चव्‍हाण, डॉ.रेणुका जोशी, डॉ.भाग्‍यश्री हंभीरे, प्रसिध्‍दी अधिकारी श्री.दिंगबर कोंडा, करिअर मिडीया कंपनीचे श्री.गौतम साबळे, श्री.निलेश ढगे, युवान संस्‍थेचे श्री.संदिप कुसाळकर, श्री.पुष्‍कर कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे म्‍हणाले की, या आधुनिक तंत्रज्ञानाच्‍या युगात नागरिकांना चांगल्‍या दर्जेच्‍या आरोग्‍य सेवा मिळाव्‍यात याकरिता अहमदनगर महानगरपालिकेच्‍या कै.बा.देशपांडे दवाखाना यांनी नेहमीच चांगले काम केले आहे. स्‍त्री प्रसुतीमध्‍ये आजही बाळासाहेब देशपांडे दवाखान्‍यामध्‍ये प्रसुतीसाठी मोठया प्रमाणात महिला येत आहेत. अत्‍याधुनिक सोनोग्राफी मशिनद्वारे बाळाची तपासणी केल्‍यामुळे बाळाचे सुक्ष व्‍यंग असतील तर ते निदर्शनास येतात त्‍यावर त्‍वरीत उपचार करता येतात. त्‍यामुळे सदृढ बाळ जन्‍माला येवू शकते. सोनोग्राफीचा मोफत सेवेचा लाभ नगर मधील सर्व महिलांनी व बालकांनी घ्‍यावा असे अवाहन मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे.

वैद्यकिय अधिकारी डॉ.सतिष राजूरकर म्‍हणाले की,बाळासाहेब देशपांडे रूग्‍णालय मोठया प्रमाणात प्रसुतीसाठी जिल्‍हयाभरातील महिला येत आहेत. त्‍यांना चांगल्‍या दर्जेच्‍या आरोग्‍य सेवा देणे गरजेचे आहे. सोनोग्राफी मशिनच्‍या माध्‍यमातून आईच्‍या पोटातील बाळाची सर्व माहिती आपल्‍याला कळणार असल्‍यामुळे निरोगी बालक जन्‍माला येईल. मनपाच्‍या माध्‍यमातून ही मोफत सेवा आहे याचा लाभ सर्वांनी घ्‍यावा असे ते म्‍हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post