ठेकेदारांनो विकासकामे दर्जेदार करा ; आ. संग्राम जगताप यांचा इशारा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – कोरोना संसर्ग विषाणूमुळे मानवी जीवनावर विपरित परिणाम झाला आहे. त्याचबरोबर आपल्यावर आर्थिक संकटही ओढवले आहे. या अडचणीच्या काळात सर्वांनी सरकारला सहकार्य करावे. सरकारच्यावतीने शहरामध्ये विविध विकासकामे मंजूर आहेत. या कामांसाठी निधी वर्ग झाला आहे. महापालिका प्रशासनाने ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. विकासाची कामे दर्जेदार व्हावी यासाठी प्रशासनाने या कामावरती लक्ष केंद्रीत करावे. ठेकेदारांनीही उत्कृष्ट दर्जेचे कामे करावीत अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. स्टेशनरोड परिसरामध्ये विविध विकास कामे मंजूर करुन आणली व आज ती कामे पूर्ण झाली आहेत. सीना नदीवरील पुलाच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे ते काम आज पूर्ण मार्गी लागले आहे. कायनेटीक चौक ते मल्हार चौकपर्यंतच्या रस्त्याची कामे पूर्ण केली आहेत. यश पॅलेस हॉटेल ते रेल्वेस्टेशनपर्यंतच्या रस्त्याची कामे पूर्ण केली आहेत. याचबरोबर या भागातील विविध विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. माजी नगरसेवक विजय गव्हाणे यांनी विविध विकासकामांसाठी नेहमीच पाठपुरावा केल्यामुळे ही कामे मार्गी लागली, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २०१७ -१८ मध्ये मंजूर असलेले मातोश्री सोसायटी ते धोत्रे घर ते गणपती मंदिरापर्यंतच्या रस्ता डांबरीकरण कामाची पाहणी करताना आ. संग्राम जगताप. समवेत माजी नगरसेवक विजय गव्हाळे व नागरिक आदी.
यावेळी बोलताना विजय गव्हाळे म्हणाले की, विकास कामांसाठी पाठपुराव्याची गरज असते. स्टेशनरोड परिसराचा विकास व्हावा, यासाठी आम्ही नेहमीच आ. संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे या भागामध्ये विविध विकास कामे मंजूर आहेत. आजतागायत आ. संग्राम जगताप यांनी मंजूर केलेली विकास कामे सुरु आहेत. मातोश्री सोसायटीमधील रस्त्याचा अनेक दिवसांचा प्रश्न प्रलंबित होता, आज तो मार्गी लागला. विकास कामांमुळे या भागाचा कायापालट झाला आहे. या पुढील काळातही या भागाच्या विकासाकामासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी आ. जगताप यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Post a Comment