सावेडी उपनगर पाणी प्रश्नी शिवसेना आक्रमक ; महापालिका आठ दिवसांचा अल्टीमेटम
प्रश्न नसुटल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याच्या उपनेते अनिल राठोड यांचा इशारा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – ऐन उन्हाळातच उपनगर मधील प्रभाग 1 ते 7 च्या नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. तसेच महापालिकेने वॉलमन वाढवावे. हे गंभीर प्रश्न आठ दिवसात सोडवा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. या बाबतचे निवेदन मनपा आयुक्त मायकलवार यांना शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी दिले. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले कि सावेडी उपनगरमध्ये गेल्या महिन्याभरापासून प्रभाग 1ते 7 या परिसरामध्ये कमी दाबाने पाणी येत आहे. तसेच काही नागरिकांच्या नळाला पाण्याचा पुरवठा होत नाही. या गोष्टीची आम्ही शहनिशा केली असता असे आढळून आले कि सदर उपनगर भागामध्ये गायकवाड कॉलनी, सिव्हील हाड्को, भिस्तबाग, बोल्हेगाव, श्रमिकनगर आदी भागामध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी सोडले जाते. याचे कारण असे दिसून आले कि काही भागात चार चार वॉल असल्या कारणाने वाल एकाचवेळी सोडून निघुन जातात. त्यामुळे काही भागात पाणी मिळते व काही भागात पाणी मिळत नाही. तसेच कोरोनाच्या काळामध्ये आपल्या महापालिकेतील सर्व वॉलमन यांनी आयुक्त यांना पत्राद्वारे विनंती केली होती कि मेनलाईन फ्लश धुवून घेणे. याबाबत पत्र देवून देखील अजूनही मेनलाईन फ्लशचे काम करून घेण्यात आलेले नाही. यामुळे देखील सुरळीत पाणीपुरवठा होण्यास अडथळा झाला आहे. लवकरच पाऊसाळा सुरु होणार असून पावसामुळे विविध ठिकाणचे सांडपाणी व कचरा वाहून येऊन पाईपलाईनचे लिकेज असलेला वॉलचे खड्यात साचून सदर दुषित पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये शिरून त्या द्वारे परिसरातील नागरिकांना दुषित पाण्या द्वारे कावीळ, कॉलरा, या सारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आताच पाण्याचे सर्व लिकेज वॉल त्वरित दुरुस्त करून घेणे आवश्यक व गरजेचे आहे.
सदर उपनगरामध्ये सुमारे १० वॉलमन असून त्यांच्यावर संपूर्ण सातही प्रभागामध्ये ठराविक कालावधीत पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. सदरील प्रभागांचा परिसर हा खूप मोठा असून सदर परिसरामध्ये मोठ्या संखेने रहीवाशी वास्तव्यास आहे. त्यामुळे त्यांना पुरेशा प्रमाणात वेळेत पाणी पुरवठा करण्याच्या प्रयत्नात सदर वॉलमेन कमी पडत आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे वॉलमन ची संखा प्रत्येक प्रभागास दोन वॉलमन या प्रमाणे संख्या करण्यासाठी वॉलमनची संख्या वाढविण्यात यावी. तसेच पाण्याच्या टाक्या ह्या पूर्ण भरल्या जात नाही. यामुळे पाण्याचा दाब कमी होऊन सर्व नागरिकांना पाणी मिळत नाही. तरी सर्व पाण्याच्या टाक्या पूर्ण भरण्यात याव्यात. तरी सदर आर्जवर 8 दिवसात कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलनच्या माध्यमातून या प्रश्नाला वाच्या फोडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
Post a Comment