केंद्राने परदेशातील भारतीय नागरिकांना भारतात येण्याची दिली परवानगी
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 18 हजार 660 झाली आहे. देशातील 26 राज्य आणि 7 केंद्र शासित प्रदेशांमध्ये संसर्ग पसरला आहे. यातील सर्वाधित प्रभावित 5 राज्यांमध्ये 86 हजारापेंधा अधिक अर्थात 73% रुग्ण आहेत. एकट्या महाराष्ट्रात 41 हजार 642 कोरोनाबाधित आहेत. यादरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने विदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना (ओसीआय) भारतात येण्यास परवानगी दिली आहे.
गृह मंत्रालयाने ओसीआयसाठी अटी घातल्या आहेत. ओसीआय कार्डधारकांच्या परदेशात जन्मलेल्या लहान मुलांना, ज्या कुटुंबात आपत्कालीन परिस्थिती आहे, जसे एखाद्याचा मृत्यू झाला असेल अशा कार्डधारकांना, असे दाम्पत्य ज्यांच्यातील एकाकडे ओसीआय कार्ड आहे आणि त्या दोघांचा भारतात कायम पत्ता आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे कार्ड आहे, परंतु त्यांचे पालक भारतात राहतात. अशा नागरिकांना भारतात येण्याती परवानगी दिली जाईल.
देशात आतापर्यंत कोरोनामुळे 3583 मृत्यू
शुक्रवारी आंध्रप्रदेशात 62, राजस्थानमध्ये 54, उत्तरप्रदेशात 6, झारखंडमध्ये 5, छत्तीसगडमध्ये 4 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. या व्यतिरिक्त आणखी 217 रूग्ण आहेत, परंतु ते कोणत्या राज्यातील आहेत याची माहिती मिळाली नाही. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 1 लाख 18 हजार 447 कोरोनारुग्ण आहेत. यातील 66 हजार 330 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 45 हजार 299 रुग्ण बरे झाले. कोरोनामुळे देशात 3583 जणांचा मृत्यू झाला आहे.
Post a Comment