कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात सरकार अपयशी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी भाजपाने पुकारलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनात नगरमध्ये भाजपाच्यावतीने चौपाटी कारंजा येथील स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ निषेध करण्यात आला. याप्रसंगी मयुर बोचुघोळ, प्रदीप परदेशी, गणेश गुजराथी, अमीत पाखले, तुषार पोटे, बंट्टी ढापसे, अभिजित चिप्पा, सुखदेव लोळगे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मयुर बोचुघोळ म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरले आहे. या प्रश्‍नी राज्यभर पुकारलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनानिमित्त नगरमध्ये चौपाटी कारंजा येथील स्वातंत्रवीर सावरकर पुतळ्यासमोर सरकारच्या निषेधार्थ काळे मास्क व काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. देशभरात महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. राज्य सरकारने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावशकत्या उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे हा प्रादुर्भाव वाढतच आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी जी यंत्रणा राबविण्याची आवश्यकता होती ती राबविली नसल्याने अनेकांचे मोठे हाल झाले आहेत. राज्य सरकारने या संकटातून मार्ग काढण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढीचा धोका निर्माण झाला असून, मजुर, कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post