अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलै महिन्यातही अशक्य
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – सायन्स, कॉमर्स, आर्ट, अभियांत्रिकी आदी शाखातील अंतिम वर्षाच्या परीक्षा सध्याची परिस्थिती पाहता जुलैमध्ये घेणेही अशक्य आहे. या संदर्भात नियुक्त समितीचा अहवाल आज सादर होणे अपेक्षित असून त्यानंतर बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले आहे.
नगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी विद्यार्थी व पालकांनी पॅनिक न होण्याचा आवाहन केले. आरोग्याचाही प्रश्न महत्वाचा असल्याने आरोग्य आणि विद्यार्थ्यांचे करिअर याचा विचार करूनच सरकार निर्णय घेईल. करोना वातावरणात परीक्षा घेणे योग्य नसल्याचा अहवाल युजीसीने दिल्यानंतर त्यावर अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली. उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण या दोन्ही खात्याचे संचालक आणि काही कुलगुरु यांचा समावेश असलेली ही समिती आहे. समितीचा पहिला अहवाल आला. तो कॅबिनेट मंत्री उदय सामंत अंतिम वर्षे वगळता इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांचा मागील परफॉर्मन्स पाहून गुण देण्याचे ठरले. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याच्या परिक्षेबाबत जून मध्ये निर्णय घेण्याचे ठरले. तस अहवाल पुन्हा सादर करण्याचे समितीला सांगितले. त्यावेळी जुलै मध्ये परीक्षा घेण्याबाबत चर्चा झाली होती. समितीचा अहवाल अहवाल आज येणे अपेक्षित असले तरी सध्याची परिस्थिती पाहता जुलै मध्ये परीक्षा घेणे अशक्य आहे. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची पूर्ण काळजी सरकार घेईल, असेही ना. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले आहे.
Post a Comment