काजू प्रक्रिया उद्योग….
माय अहमदनगर वेब टीम
फळबागांची शेती करण्यास शासनाने प्रोत्सहान व अनुदान दिल्याने काजूंचे उत्पादन मोठया प्रमाणावर होत आहे. देशाची लोकसंख्या वाढल्याने फळप्रक्रिया ही काळाची गरज आहे. आंबा, काजू द्राक्षे, यासारख्ये फळांवर प्रक्रिया करून नविन उदयोजक मोठया प्रमाणावर उत्पन्न मिळवु शकतात. फळप्रक्रिया उद्योग हा आज एक आधुनिक व्यवसाय बनला आहे. प्रक्रिया केलेल्या फळाचा ज्युस, पावडर, पदार्थ यांना आज बाजारपेठेत मोठी मागणी आहे. बरीचशी फळे ही सिझनल असतात. ठराविक ऋतु मध्येच त्यांचे उत्पादन मिळते. त्यामुळे अशा फळांवर प्रक्रिया करणारे आज लहान-मोठे कित्येक उद्योग उभे राहिले आहे. त्यापैकीच एक आहे, काजू फळ प्रक्रिया उद्योग.
काजू बी पासून काजूनिर्मिती –
काजू बीवर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात. काजू प्रक्रिया उद्योग वर्षभर चालू राहण्याच्या दृष्टीने काजू बिया वाळवून योग्य प्रकारे साठवणे गरजेचे असते. बियांपासून काजूगर मिळविण्यासाठी त्या वाफावणे, थंड करणे, विशिष्ट कटरचा वापर करून त्यावरील टरफल वेगळे करणे, काजूगरावरील साल (टेस्टा) काढण्यासाठी नियंत्रित तापमान ठेवून वाळविणे, विशिष्ट धारदार संयंत्र वापरून टेस्टा बाजूला करणे, प्रतवारी, योग्य आर्द्रता राखण्यासाठी कंडिशनिंग करणे, निर्वात पोकळी व नायट्रोजन फ्लशिंग पद्धतीने पॅकिंग करणे इत्यादी टप्प्यांचा समावेश होतो. 25 टक्के उतारा गृहीत धरल्यास एक किलो काजू बियांपासून 250 ग्रॅम काजूगर मिळू शकतात.
बाजारपेठ –
मसाल्यामध्ये, जेवणामध्ये ज्युसमध्ये, खारीसारखे गोड पदार्थ बनवितांना, स्वीट मार्टच्या दुकानातील बर्फी सारख्या पदार्थामध्ये काजूचा वापर होतो. काजू आज मार्केटमध्ये आपणांस सातशे ते आठशे रूपये किलो दराने मिळतो. अशा प्रक्रिया केलेल्या काजूला मोठा दर व मागणी आहे. स्वीट मार्ट, मिठाईची दुकाने, मसाल्याची दुकाने, किराणा मालाच्या दुकानात तुम्ही हाव्या असणाऱ्या प्रतीचा काजू विकु शकतात. काजू विक्रीसाठी तुम्हांला बाहेरची बाजारपेठ शोधावी लागत नाही. ग्रामीण पासुन शहरी पर्यंत प्रत्येक दुकानात काजूला मागणी असते.
प्रकल्पविषयक –
या उदयोग उभारणीसाठी अंदाजे १ ते १.५० लाख रूपये खर्च येतो. या उदयोगाकरिता पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत अर्थसाहाय्य मिळू शकते किंवा स्थानिक बँकेकडून सुध्दा आपणांस पंत पाहून कर्ज मिळू शकते.
Post a Comment