'बाहुबली' फेम अभिनेता राणा डग्गुबतीचा मिहिका बजाजसोबत साखरपुडा


माय अहमदनगर वेब टीम
'बाहुबली' या चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणारा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबतीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. मिहिका बजाज हे राणाच्या भावी पत्नीचे नाव आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हैदराबाद येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दोघांचा साखरपुडा झाल्याचे समजते.
राणाने 12 मे रोजी इंस्टाग्रामवर पहिल्यांदा मिहिकासोबतचा फोटो शेअर करुन 'तिने होकार दिला आहे', अशी रोमँटिक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर दोघे लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. आता 20 मे रोजी साखरपुडा करुन हे दोघे ऑफिशिअली एंगेज्ड झाले आहेत. राणाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर साखरपुड्याचे दोन फोटो शेअर करुन 'And it’s official!!', असे ट्विट केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post