हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर फक्त क्लीनिकल ट्रायलसाठीच करावा
माय अहमदनगर वेब टीम
ब्राझिलिया - दक्षिण अमेरिकी देश ब्राझीलमध्ये काेराेनामुळे एका दिवसात सर्वाधिक ११७९ जण मृत्युमुखी पडले. तत्पूर्वी सर्वाधिक ८८१ रुग्णांचा १२ मे राेजी मृत्यू झाला हाेता. काेराेनाने सर्वाधिक पीडित असलेला ब्राझील जगातील चाैथ्या क्रमांकाचा देश आहे. आतापर्यंत ब्राझीलमध्ये २ लाख ७१ हजार ८८५ रुग्ण आढळून आले आहेत, तर १७ हजार ९८३ एकूण रुग्णांना प्राण गमवावे लागले.
ब्राझील नर्सिंग आॅब्झर्व्हेटरीच्या मते, देशात १४ हजार ८६१ आराेग्य कर्मचारी बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक १०९ महिला आराेग्य कर्मचारी आहेत. साआे पावाेलाे येथील परिचारिका विवियन कॅमार्गाे म्हणाल्या, आम्हाला पीपीई किट मिळाले नाही. बहुतांश परिचारिकांना हे किट परिधान करण्याविषयीची माहिती नाही. त्यानंतरही त्या सर्रास त्याचा वापर करतात आणि काेराेना पाॅझिटिव्ह हाेत आहेत. ब्राझील फेडरल काैन्सिल आॅफ नर्सेसच्या सदस्य वालकिरियाे अल्मेडिया म्हणाले, काही रुग्णालयांत कर्मचारी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एकाच किटचा वापर करतात. त्यातूनही प्रादुर्भाव हाेताे. बाधित कर्मचाऱ्यांत ६० वर्षांहून जास्त वयाचे लाेकही आहेत.
शेजारी देश : ब्राझीलवर निर्बंध शक्य : ट्रम्प
राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प म्हणाले, ब्राझीलमधून अमेरिकेत प्रवास करण्यावर निर्बंध लावले जाऊ शकतात. ब्राझीलहून काेणीही अमेरिकेला येऊन येथील नागरिकांना बाधित करू नये, असे आम्हाला वाटते. आम्ही ब्राझीलला व्हेंटिलेटर पाठवून मदत करत आहाेत. काेराेनाचे नियंत्रण करण्यात अपयश आल्याने ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बाेलसाेनाराे यांच्यावर टीका हाेत असतानाच ट्रम्प यांनी भूमिका जाहीर केली आहे.
राेजगार ठप्प : २५ टक्के लाेकसंख्या घरातच
कंपन्यांना पुन्हा काम सुरू करण्यासाठी निधी देण्यात सरकार सक्षम नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात राेजगाराचे माेठे संकट आहे. येथे अनेक लाेक वाहन कारखान्यात काम करतात. एप्रिलमध्ये कारखान्यांचे उत्पादन १९५७ नंतरचे सर्वात कमी उत्पादन ठरले. दुसरीकडे २५ टक्के लाेकसंख्या घराबाहेर पडली नाहीतर त्यांच्यासमाेर दाेन वेळच्या जेवणाची समस्या निर्माण हाेऊ शकते. सुमारे १.४० काेटी लाेक झाेपड्यांत राहतात.
आराेग्यसेवा : एक तृतीयांश शहरांकडे कमी व्हेंटिलेटर
ब्राझीलच्या एक तृतीयांश शहरांकडे १० हून कमी व्हेंटिलेटर आहेत. सरकारने १५ हजार व्हेंटिलेटर खरेदी केले हाेते. त्यापैकी केवळ ८०० रुग्णालयांपर्यंत पाेहाेचले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार व्हेंटिलेटर रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था नाही. त्याआधी वैद्यकीय उपकरणाच्या खरेदीतील दिरंगाईप्रकरणी सरकारने आराेग्यमंत्र्याला हटवले हाेते. त्यानंतर आराेग्य खात्याची सूत्रे घेणाऱ्या मंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला हाेता.
Post a Comment