कांदा लसूण प्रक्रिया उद्योग…




माय अहमदनगर वेब टीम
कांदा लसूण ही पिकेदेखील प्रक्रिया उदयोगाच्या दृष्टिने अत्यंत महत्वाची आहेत. कांद्याची पावडर, काप, रिंग्य, व्हिनेगारमधील छोटा पांढरा कांदा यांसारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांना अमेरिका, ऑस्ट्रेलिया जपान व युरोपीय देशात कांदा लसून मसल्याची मोठया प्रमाणात मागणी दिसून येत आहे. तसेच कांदा, लसून व आल्याची पेस्ट अशा पदार्थांना देखील चांगली मागणी आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी कांदा लसून मसाल्यास मागणी अधिक प्रमाणात आहे.
 
उद्योग :- 
कांदा लसून मसाला प्रत्येक घरी स्वयंपाकात गरजेची वस्तू दिवसेंदिवस गरजेची बनली आहे.  सध्याच्या गतिमान जीवनात -विशेषतः शहरांमध्ये  कांदा लसून मसाला बनवण्यास गृहिणींना सवड मिळत नाही. नोकरदार, परगावी स्थायिक झालेल्यांना, तसेच ज्या ठिकाणी स्वयंपाक अधिक मोठ्या प्रमाणात असतो, तेथे तयार चटणी असेल तर काम वेळेवर व सुलभ होते. त्यामुळे कांदा लसून मसालास मागणी वाढत आहे. त्यामुळे हा उद्योग सुरु केल्यास आपल्याला चांगले यश प्राप्त होऊ शकते.

बाजारपेठ :-
कांदा लसून मसालास अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात मागणी आहे. हॉटेल,खानवळ,  किराणा दुकान, या ठिकाणी आपण जाऊन कांदा लसूनच्या आर्डर सुध्दा घेऊ शकता. तसेच या उत्पादनाची विक्री करण्यासाठी विविध बाजारपेठा मध्ये छोटे दुकान लावून आपण यासाठी बाजारपेठ तयार करू शकता. या उद्योगास सहजरित्या बाजारपेठ तयार होते.
 
 
प्रकल्पविषय :-  
कांदा लसून प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी साधारण ५ ते ७ लाख रूपये खर्च येते. उद्योग सुरू झाल्यावर खर्च कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो. तसेच बॅक सुध्दा पत पाहून आपणांस कर्ज पुरवठा करते. हा उद्योग उभारल्यास आपण आर्थिक संपन्न होऊ शकता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post