नाथाभाऊंना होम क्वॉरंटाइन कोणी केलं ?
माय अहमदनगर वेब टीम
जळगाव- राज्यासह जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यावर भाजपचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळावर आरोप केला की, ते घरात बसून असल्याने महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे.
लोकप्रतिनिधी व प्रशासनात समन्वय नसल्याने खान्देशातही रुग्ण संख्येत वाढ झाली असून यात शासनाचे अपयश आहे, असा आरोप माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला होता.
त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला की, माजी पालकमंत्री कोरोना संदर्भात आंदोलन करणार आहेत, त्यावर ना.गुलाबराव पाटील म्हणाले की, सध्या कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. आंदोलन करण्यापेक्षा कोरोनाच्या परिस्थितीत अडकलेले आहेत त्यांना मदत करावी.
महाराष्ट्रावर ज्याप्रकारे आरोप करीत आहे, तसा गुजरात, दिल्ली येथील लोकप्रतिनिधींवर करावा. तसेच नाथाभाऊंना होम क्वॉरंटाइन कोणी केलं ? असा पलटवार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.
Post a Comment