तीन महिने ग्राहकांना लुबाडू शकणार नाहीत हवाई कंपन्या


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - भारतात लॉकडाउनमुळे ठप्प पडलेली देशांतर्गत विमानसेवा 25 मे पासून पुन्हा सुरू होणार आहे. या निमित्त नागरी उड्डयन मंत्री हरदीप पुरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केले. पुढील तीन महिन्यांपर्यंत हवाई भाडे फिक्स्ड राहतील असे पुरी यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, सुरुवातीच्या तीन महिन्यांसाठी कुठल्याही एअरलाइन कंपनीला मनमानी कारभार करून ग्राहकांना लुबाडता येणार नाही. त्यामुळेच हे भाडे सध्या फिक्स्ड ठेवले जात आहेत. दिल्ली-मुंबई ची 90-120 मिनिटांची हवाई सफर करण्यासाठी किमान 3500 रुपये आणि कमाल 10 हजार रुपयांपर्यंत भाडे वसूल करता येणार आहे.
फ्लाइटचे रुट वेळेनुसार विभाजित करण्यात आले आहेत
1. 40 मिनिटांपेक्षा कमी
2. 40-60 मिनिटे
3. 60-90 मिनिटे
4. 90-120 मिनिटे
5. 120-150 मिनिटे
6. 150-180 मिनिटे
7. 180-210 मिनिटे
40% जागा मिळतील स्वस्तात
पुरी यांच्यासोबत या पत्रकार परिषदेत सिव्हिल एव्हिएशन सेक्रेटरी सेकेट्री प्रदीप सिंह खरौला देखील उपस्थित होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, 40% जागा प्राइज बँडच्या मिडपॉइंटपेक्षा कमी दरात उपलब्ध करून दिल्या जातील. उदाहरणार्थ 3 हजार 500 रुपयांपासून 010 हजार रुपयांपर्यंतच्या प्राइज बँडचा मिडपॉइंट 6 हजार 700 रुपये आहे. अर्थातच हवाई कंपन्यांना 40 टक्के जागा 6,700 रुपयांपेक्षा कमी किंमतीत बुक कराव्या लागणार आहेत. दरम्यान, वंदे भारत मिशन अंतर्गत 5 मे पासून आतापर्यंत 20 हजार भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. त्यानंतरही परदेशांमध्ये अडकेलल्या भारतीयांना देशात आणण्याचे काम सुरूच आहे. अशी माहिती सुद्धा पुरी यांनी यावेळी बोलताना दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post