पोलिसांना आपत्ती सेवा पदक देऊन गौरविण्यात येणार



माय अहमदनगर वेब टीम
पुणे – करोनाच्या संकटासारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात चांगली कामगिरी केलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना आपत्ती सेवा पदक अथवा इतर पदकांनी लवकरच गौरविण्यात येणार आहे. या दृष्टीकोनातून आवश्यक असणारा प्रस्ताव तत्काळ गृहविभागाकडे पाठविण्याच्या सूचना महासंचालक कार्यालयास देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कार्याचा यथोचित गौरव होऊन त्यांच्यावर कौतुकाची थाप पडणार आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी दिवसरात्र पोलिस रस्तावर उभे राहून कर्तव्य पार पाडत आहेत. या कालावधीत अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. काही जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला. अशा कठीण प्रसगांत पोलिस करोना विरुद्ध लढा देत आहेत. त्यामुळे या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात चांगली कामगिरी केलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना आपत्ती सेवा पदक अथवा इतर पदकांनी लवकरच गौरविण्यात येणार आहे.

सध्या करोना ही राष्ट्रीय आपत्ती असून त्यामध्ये पोलिस कायदा सुव्यवस्था राखणे, सामाजिक बांधिलकी म्हणून गरजूंना मदत करण्याचे काम करत आहेत. या लढ्यात मुख्यत्वे पोलिस शिपायापासून ते निरीक्षकांपर्यंत रस्त्यावर उतरून काम करत आहेत. त्यानुळे काहींना मृत्यूला देखील सामोरे जावे लागले आहे. तरीही जीवाची पर्वा न करता अशा पोलिस कर्मचारी व अधिकार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपत्ती सेवा पदकाने गौरविण्याचा प्रस्ताव तत्काळ पाठवावा, अशा सचूना महासंचालक कार्यालयास गृहविभागाने दिल्या आहेत. गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी हा आदेश काढला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा, महानगर पालिका प्रशासन, पोलिस आणि आरोग्य विभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहेत. 23 मार्च पासून देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतर संचारबंदी व नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पोलिस बंदोबस्तावर तैनात झाले. तेव्हापासून पोलिस आजतगायत कामच करत आहेत. अनेक पोलिस करोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागात देखील कर्तव्य बजावत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post