पोलिसांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्या औषधांचे वाटप
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथील पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे होमियोपॅथीच्या आर्सेनिक अल्बम ३० या औषधांचे वाटप करण्यात आले.
आयुष्य मंत्रालय दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे कोविड-१९ या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. कोरोनाच्या संकटकाळात पोलिसांवर मोठा शारीरिक व मानसिक तणाव आहे. या महामारीशी लढा देताना पोलीस दिवस-रात्र कार्यरत आहे. राज्यातील अनेक पोलीसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाशी लढा देणार्या पोलीसांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या होमियोपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. सदर औषधांचे पाकिट पोलिस मित्र संघटना व वंदे मातरम युवा प्रतिष्ठानच्या वतीने कारागृहाचे सिनियर जेलर श्यामकांत शेडगे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष संभव काठेड, अध्यक्ष अमित इधाटे, महिला अध्यक्षा शारदा होशिंग, ईश्वर बोरा, श्याम भूमकर, अॅड.हरीश कल्याणी, प्रतीक बोगावत, संदीप बायड, सुमित वाघ, यश मीरांडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment