करोनामुळे या खेळाला 700 कोटींचा फटका
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली – करोनामुळे क्रीडा जगतातील जवळपास सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. यामुळे भारतीय क्रिकेटचे सुमारे 700 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच करोना व्हायरसचा मोठा परीणाम खेळाचे साहित्य बनवणार्या कंपन्यांवरही झाला आहे. सध्याच्या घडीला भारतामध्ये कुठेच क्रिकेट स्पर्धा सुरु नाहीत.
त्यामुळे क्रिकेटचे साहित्य बनवणार्या नामवंत कंपन्या बंद आहेत. जोपर्यंत स्पर्धा सुरु होणार नाहीत तोपर्यंत या कंपन्यांना ऑर्डर मिळणार नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला या कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. पण त्यांच्याकडे या समस्येवर कोणतेही उत्तर नाही.
मार्च आणि मे महिन्यांत भारतात जास्त क्रिकेट खेळले जाते. त्यामुळे या कालावधीमध्ये जास्त क्रिकेटची उपकरणं विकत घेतली जातात. त्यामुळे काळात क्रिकेटच्या साहित्यांची सर्वाधिक विक्री होत असते. पण भारतामध्ये सध्या लॉकडाऊन असल्यामुळे कोणतीही क्रिकेटची स्पर्धा सुरु नाही आणि या गोष्टीचा फटका क्रिकेट साहित्य बनवणार्या कंपन्यांना बसला आहे.
मार्च ते मे या कालामधीमध्ये खेळ आणि फिटनेस संबंधित कंपन्यांना चांगला फायदा होत असतो. पण सध्याच्या घडीला या कंपन्यांना जवळपास 700 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. जोपर्यंत भारतामध्ये लॉकडाऊन उठून क्रिकेट सुरु होत नाही तोपर्यंत या कंपन्यांना तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन कधी उठणार, याकडे या कंपन्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
क्रिकेट साहित्य बनवणारी एसजी ही भारतातील एक मोठी कंपनी आहे. या कंपनीचे मालक पारस आनंद यांनी सांगितले की, या उद्योगाला वर्षभरात दीड हजार करोड रुपये मिळत असतात. आपल्या उद्योगातील सर्वात चांगला काळ हा मार्च ते मे महिना असतो. पण सध्याच्या घडीला देशात लॉकडाऊन आहे आणि त्यामुळेच आम्हाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
Post a Comment