कोरोना / राज्यात गुरुवारी 1602 नव्या रुग्णांची नोंद, 44 जणांचा मृत्यू; एकूण संख्या 27524
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - गुरुवारी राज्यात एकाच दिवसात उच्चांकी १,६०२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यातील रुग्णसंख्या २७ हजार ५२४ झाली आहे. गुरुवारी ४४ जणांचा मृत्यू झाला. बळींचा आकडा १०१९ वर पोहोचला आहे. राज्यात गुरुवारी ५१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात ६०५९ रुग्ण बरे झाले आहेत.
रुग्णांचा तपशील :
मुंबई मनपा १६७३८, ठाणे १३८१, नवी मुंबई १११३, कल्याण डोंबिवली ४२४, उल्हासनगर ८२, भिवंडी ३९, मीरा भाईंदर २४८, पालघर ४२, वसई विरार २९५, रायगड १६६, पनवेल १६१
मंडळनिहाय तपशील :
नाशिक मंडळ ११९३, पुणे मंडळ ३७८३, कोल्हापूर मंडळ १५८, औरंगाबाद मंडळ ७९९, लातूर मंडळ ९४, अकोला मंडळ ४२८, नागपूर ३३९, इतर राज्ये ४१.
> 2 लाख 40,145 आजवर चाचण्या
> 2 लाख 12,621 जणांचे अहवाल निगेटिव्ह
> 3 लाख 15,686 नागरिक होम क्वाॅरंटाइन
> 15,465 नागरिक संस्थात्मक क्वाॅरंटाइन
पुण्यात १६९ कोरोनाचे नवीन रुग्ण, ६ जणांचा मृत्यू; ५१ टक्के झाले बरे
दिवसाआड पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गेल्या २४ तासांत तब्बल १६९ कोरोनाबाधित व्यक्ती सापडले आहेत, तर १०९ व्यक्ती ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ३ हजारच्या जवळपास पोहोचली आहे. ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.
आतापर्यंत पुणे शहरात २ हजार ९८७ बाधित व्यक्ती सापडले आहेत. त्यातील १ हजार ४८६ व्यक्ती बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या २४ तासात १ हजार ४१५ करोना संशयित व्यक्तीचे नमुने घेण्यात आले. तपासणीची संख्या वाढल्यामुळे बाधितांची संख्या वाढल्याचे दिसून येते. त्यामध्ये नायडू रूग्णालयात १३४ ससूनमध्ये ७ तर खासगी रुग्णालयात २२ जणांचा समावेश आहे. सद्यस्थितीत १ हजार ३३२ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यातील नायडू आणि त्या अंतर्गत असलेल्या रुग्णालयामध्ये ९५३, ससूनमध्ये ११० आणि खासगी रुग्णालयात २६९ जणांवर उपचार सुरू आहते. तर ११६ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील ३४ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पुणे महानगरापालिका सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली. तर, पिंपरी चिंचवड मध्ये पाच नवे कोरोना रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या १८३ पर्यंत पोहोचली आहे.
दीड हजारांवर रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुणे शहर व परिसरात मागील दाेन महिन्यांच्या कालावधीत काेराेनाचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणात झाल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली हाेती. मात्र, प्रथमच काेराेना रुग्णांची संख्या ही डिस्चार्ज रुग्णांपेक्षा कमी झाल्याचे दिसून आले आहे. पुण्यात आतापर्यंत एकूण तीन हजार ३२५ काेराेना रुग्ण सापडले असून गुरुवारी १६९ रुग्णांची त्यात भर पडली. मात्र, पुणे परिसरातील १५३३ रुग्णांना आतापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून एक हजार ६४१ रुग्णांवरच रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
Post a Comment