‘कौन बनेगा करोडपती’चा बारावा हंगाम लवकरच
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन वाहिनीवरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’चा १२ वा हंगाम लवकरच सुरु होणार आहे.
या हंगामाचे रजिस्ट्रेशन ९ मे २०२० रात्री ९ पासून सुरु झाले आहे. २२ मे पर्यंत प्रत्येक रात्री बिग बी एक नवीन प्रश्न विचारणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना या स्पर्धक म्हणून सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना या प्रश्नांची योग्य उत्तरे संदेशाच्या आधारे सोनी लिव्ह ऍपच्या आधारे देण्याची संधी मिळणार आहे.
‘अपना टाईम आयेगा… ऐसे कैसे आयेगा… जबतक अपने सपनोको तू… सोतेसे न जगाएगा. कोरोना व्हायरसच्या बचावासाठी संपूर्ण सिलेक्शन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
सामान्यज्ञान परीक्षण आणि व्हिडीओ सबमिशन सोनी लिव्ह माध्यमातून आयोजित केले जातील. ऑडिशन पूर्ण झाल्यावर पर्सनल इंटरव्हीयू व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून होईल.
हिंदी बॉलिवूड सृष्टीतील शहेनशाह , महानायक, बीग बी अशा अनेक टोपणनावांतून सिनेसृष्टीत आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून अभिनयाची छाप पडणारे हिंदी, इंग्रजी अशा अनेक भाषांबद्दल असलेले सामान्यज्ञान, त्यांची शरीरयष्टी, देहबोली, यांसारख्या अनेक गोष्टींचे भारतात करोडो चाहते दिवाने आहेत.
या कार्यक्रमाचे दिग्दर्शन नितेश तिवारी आणि राहुल वर्मा यांनी केले आहे. आतापर्यंत पार पडलेल्या ११ हंगामापैकी सुरुवातीच्या २ हंगामाचे सूत्रसंचालन अमिताभ बच्चन यांनी केले आहे. फक्त तिसऱ्या हंगामाचे सूत्रसंचालन शाहरुख खान यांनी केले होते. त्यानंतर सातत्याने बीग बी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत.
या कार्यक्रमाचे प्रसारण सुरुवातीला स्टार प्लस वाहिनीवर करण्यात येत होते. त्यानंतर सोनी वाहिनीवर करण्यात येत आहे. या खेळात सहभागी होण्यासाठी गावागावातून, शहरांतून स्पर्धक आपले नशीब अजमावण्यासाठी सहभागी होण्यासाठी येत असतात.
मुख्य खेळाला प्रारंभ होण्यापूर्वी फास्टर्स फिगर्स फस्टचा प्रश्न विचारण्यात येतो. या प्रश्नाचे क्रमाने ऊत्तर देऊन हॉटसीटवर जाण्यासाठी स्पर्धक एकमेकांमध्ये स्पर्धा लावतात. मुख्य खेळात एकूण १५ प्रश्न स्पर्धकाला विचारले जातात. पहिला प्रश्न १०००, असे करत करत अखेरचा १५ वा प्रश्न हा जॅकपॉट प्रश्न असतो. या खेळात पाचवा प्रश्न दहा हजार , आणि १० वा प्रश्न तीन लाख वीस हजारांचा असतो. एकदा स्पर्धकाने हा टप्पा पार केला की तो ही किमान रक्कम येथून निश्चितपणे आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो.
एखाद्या प्रश्नाचे उत्तर देण्यात स्पर्धकाला अडचण निर्माण झाली तर, त्याला मदतीसाठी लाईफ लाईनची सोय असते. यात फिफ्टी फिफ्टी, ऑडिअन्सपॉल, फोनोफ्रेन्ड, डबडतीप, एक्स्पर्ट अडव्हाइस प्रश्न बदलणे म्हणजेच फ्लिप करणे अशी सोय असते. शिवाय दर शुक्रवारी या कार्यक्रमात एक विशेष अतिथी बोलावले जातात.
आतापर्यंत शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, सोनाली बेंद्रे, अमीर खान यांना ही संधी देण्यात आली होती. शिवाय घरबसल्या रसिकांना विश्रांतीत प्रश्न विचारले जातात. प्रश्नाचे उत्तर योग्य देणाऱ्या स्पर्धकाला या कार्यक्रमाला हजर राहण्याची संधी मिळते.
परंतु सध्याच्या कोव्हीड १९ च्या लॉकडाऊन परिस्थितीत या कार्यक्रमात काही बदल अपेक्षित आहेत.
Post a Comment