कशाचं लॉक निघणार, कशाचं राहणार..आज कळणार



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई – नवीन लॉकडाऊन कसा असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितले होते की, येणारा लॉकडाऊन हा एकदम आगळ्यावेगळ्या पद्धतीचा असेल.

आगळ्यावेगळ्या पद्धतीचा म्हणजे नेमका कसा असा प्रश्न लोकांना पडला आहे. त्यामुळे येणार्‍या लॉकडाऊनमध्ये कशाचं लॉक निघणार आहे, कशाचं राहणार आहे हे आज रविवारी कळणार आहे. भारतात हा चौथा लॉकडाऊन असेल. दरम्यान तिसरा लॉकडाऊन संपेपर्यंत भारतातील करोना रुग्ण संख्या शून्य व्हायला पाहिजे होती. पण असे झाले आहे का तर नाही. काल आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात करोना बाधीतांची संख्या 85,940 वर पोहोचली आहे. तर देशात करोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 2,752 झाली आहे.

या आराखड्यानुसार 30 एप्रीलपर्यंत करोनाबाश्रितांची संख्या वाढतच जाईल. आणि मग त्यानंतर हळूहळू कमी होत जाईल. 16 मे या तारखेला देशात करोनाचा एकही रुग्ण नसेल अशा पद्धतीचा एक आराखडा केंद्र सरकारने तयार केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने त्या पद्धतीने काम करण्यास सुरुवात केली, सर्व प्रकारच्या यंत्रणा कामाला लागल्या. लोकांपर्यंत अनेक सुविधा पोहोचवल्या गेल्या. हजारो सूचनांचा भडिमार झाला. तरीही सद्यस्थितीत देशातील करोनाबाधीतांची संख्या 85 हजारांपेक्षा जास्त आहे.

आतापर्यंत लॉकडाऊनमुळे काय कमावले आणि काय गमावले हे सर्वांनाच माहिती आहे. अजूनही देशातील परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. आता येणारा लॉकडाऊन हा परिस्थितीत किती बदल करतो हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post