3 आठवड्यात पेट्रोल प्रतिलिटर 9.17 रुपये, तर डिझेल 11.13 रुपयांनी महागले
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली – देशात सलग 21 दिवस सुरु असलेली इंधन दरवाढ केवळ रविवारच्या दिवशी थांबली होती. मात्र आज सोमवारी पुन्हा एकदा इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या भावांमध्ये मुंबई-दिल्लीसह देशाच्या बहुतांश भागात पुन्हा वाढ झालेली आहे. गेल्या तीन आठवड्यात पेट्रोल प्रतिलिटर जवळपास 9.17 रुपये, तर डिझेल 11.13 रुपयांनी महागले आहे.
आता या वाढीनंतर मुंबईमध्ये पेट्रोल 87.17 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 78.81 रुपये प्रतिलिटर दर असणार आहे. पेट्रोल 5 पैसे प्रतिलिटर, तर डिझेल 12 पैसे प्रतिलिटर महाग झाले आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 80.43 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 80.53 रुपये प्रतिलिटर दर आहे. डिझेलच्या किमती पेट्रोलपेक्षा जास्त असल्याचे चित्र दिल्लीत पाहायला मिळत आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीत दिवसागणिक घट होऊन देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसतेय. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांचा सामान्यांना मोठा फटका बसत आहे. रविवारी तब्बल 21 दिवसांनंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. मात्र त्याआधी सलग 20 दिवस इंधन दरवाढ सुरु होती. शनिवारपर्यंत तीन आठवड्यांमध्ये पेट्रोलच्या दरात 9.12 रुपये तर डिझेल दरात 11.1 रुपयांची वाढ झाली आहे.
Post a Comment